धाराशिव  जिल्ह्यात अवैध  जुगार आणि मद्य विरोधी कारवाई 

 
crime

भुम  : चिंचपूर ढगे, ता. भुम येथील- शेखर नवनाथ ढगे हे दि.16.04.2023 रोजी 23.30 वा. सु. वालवड ते भुम रोडलगत ढगे चिंचपूर येथे अंदाजे 21,720 ₹ किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या सिलबंद  बाटल्या सह मोटरसायकल अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

मुरुम  : कदेर, ता. उमरगा येथील- हुसनच्या अमलय्या तेलंग हे दि.17.04.2023 रोजी 11.00 वा. सु. मुरुम बेरडवाडी जाणारे रोडलगत येथे अंदाजे 2,250 ₹ किंमतीच्या सिंदी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

तामलवाडी  : खडकी, ता. तुळजापूर येथील- मलृलीकार्जुन काशिनाथ जवान हे दि.17.04.2023 रोजी 21.30 वा. सु. खडकी गावाच्या रोड लगत येथे अंदाजे 5,050 ₹ किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या सिलबंद  बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

तुळजापूर  : तिर्थ (बु), ता. तुळजापूर येथील- हजरत दगडू तांबोळी हे दि.17.04.2023 रोजी 20.00 वा. सु. तिर्थ (बु) शिवार येथे अंदाजे 1,330 ₹ किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या सिलबंद  बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

आंबी  : सोनारी, ता. परंडा येथील- अनिल सदाशिव माने हे दि.17.04.2023 रोजी 20.00 वा. सु. सागर हॉटेलजवळ सोनारी येथे अंदाजे 2,200 ₹ किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.           

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंर्तगत  संबंधीत पोठा येथे  स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.

 जुगार विरोधी कारवाई

 मुरुम : जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.17.04.2023 रोजी  11.30 वा. सु. मुरुम पोठा हद्दीत छापा टाकला  यावेळी सुंदरवाडी, ता. उमरगा येथील- नितीन मनोहर घुळे हे सुंदरवाडी गावात आईच्या मंदीराजवळ मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,170 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

वाशी  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.17.04.2023 रोजी  11.00 वा. सु. वाशी पोठा हद्दीत  4 छापे टाकले  यावेळी भिमनगर,वाशी येथील- सुंदर निवृत्ती सुकाळे हे पारा चौकातील पारा ते इंदापूर जाणारे रोडलगत पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 510 ₹ रक्कम बाळगलेले, तर वाशी  येथील- आसाराम चंद्रकांत बावकर हे याच दिवशी 11.50 वा. सु. भिमनगर गल्लीत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 510 ₹ रक्कम बाळगलेले, तर वाशी येथील- नाना रामराव चेडे हे याच दिवशी 11.30 वा. सु. धनश्री बिअरबारचे समोरील पान सेंटरमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 590 ₹ रक्कम बाळगलेले, तर साठेनगर, वाशी येथील- प्रशांत प्रभाकर गायकवाड हे साठेनगर चौकात एम एस ई बी चे डेपी जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 450 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

नळदुर्ग  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.17.04.2023 रोजी  11.30 वा. सु. नळदुर्ग पोठा हद्दीत छापा टाकला यावेळी बोरगाव (तु), ता. तुळजापूर येथील- हुजुर मेहबुब शेख  हे बसस्थानक नळदुर्ग येथील पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,420 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

             यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबधीत पोठा येथे स्वंतत्र 6 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web