उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जुगार विरोधी कारवायादरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 03.01.2022 रोजी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन 11 जुगाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 4 गुन्हे नोंदवले आहेत.

1) कळंब येथील हारुण उहमद शेख व बापू उमाकांत सुरवसे हे दोघे दि. 03.01.2022 रोजी कळंब येथील अनिल भोजनालयासमोर तर कळंब येथील साप्ताहिक बाजार मैदानात शाहरुख जलील शेख व यशवंत महादेव रण हे मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह एकुण 2,100 ₹ रक्कम बाळगलेले असतांना कळंब पोलीसांना आढळले.

2) जळकोट गावातील सुयश बारसमोर ग्रामस्थ- श्रीकांत दत्तात्रय थोरात व सोलापूर येथील- शिवानंद श्रीशल्य सोलापुरे हे दोघे ऑनलाईन चक्री जुगार साहित्यासह रोख रक्कम असा 33,800 ₹ चा माल बाळगलेले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर यांच्या पथकास आढळले.

3) जळकोट, ता. तुळजापूर येथील रस्त्या बाजूस ग्रामस्थ- सुर्यकांत नळगे, राजेंद्र माळी, अहमद शेख, विष्णु सगर, राजेंद्र कदम हे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 4,420 ₹ रक्कम बाळगलेले असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले.

अवैध मद्य विरोधी कारवाई

परंडा  : अवैध मद्य विक्री विरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी दि. 03.01.2022 रोजी जिल्हाभरात 5 ठिकाणी छापे मारले. छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन 5 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 5 गुन्हे नोंदवले आहेत.

1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथाकास टेलरनगर, ता. तुळजापूर येथील दलीत किसण बागडे हे राहत्या गल्लीत 180 मि.ली. क्षमतेच्या 32 बाटल्या विदेशी दारु बाळगलेले आढळले.

2) नळदुर्ग पोलीसांना कुरेशी गल्ली, नळदुर्ग येथील सतिश मुरलीधर कनकधर हे राहत्या परिसरात 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

3) उस्मानाबाद (श.) पोलीसांना उस्मानाबाद ग्रामस्थ- रमेश रामचंद्र खंडागळे हे शहरातील चंद्रलोक हॉटेलसमोरील रस्त्याकडेला 4,985 ₹ किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या बाळगलेले आढळले.

4) उमरगा पोलीसांना उमरगा ग्रामस्थ- खंडू डिगंबर कांबळे हे उमरगा शहरात 1,500 ₹ किंमतीचे शिंदी हा अंमली द्रव बाळगलेले आढळले.

5) तामलवाडी पोलीसांना खडकी तांडा, ता. तुळजापूर ग्रामस्थ- गुरुनाथ थाउ राठोड हे तांडा परिसरात 2,550 ₹ किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या बाळगलेले आढळले.

From around the web