उस्मानाबादेत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : भा.दं.सं. कलम- 461, 379, 34 अंतर्गत उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे नोंदवण्यात आलेला गुन्हा क्र. 293 / 2019 यातील आरोपी- आबा सिद्राम पवार, वय 40 वर्षे, रा. पारधी पिढी, पळसप, ता. उस्मानाबाद हा गेली 3 वर्ष पोलीसांना मिळुन येत नसल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. तो येडशी येथे आला आल्याच्या गोपनीय माहितीवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पोनि- श्री. साबळे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- किशोर रोकडे, पोहेकॉ- चौधरी, पोना- समाधान वाघमारे, पोकॉ- तांबोळी, खैरे यांच्या पथकाने त्यास काल दि. 21.12.2021 रोजी  येडशी येथून अटक केली आहे.

चोरीचे दोन गुन्हे 

वाशी : पखरुड शिवारातील इंडस कंपनीच्या मनोरा येथील जिवोचे कॉपर वायर 8 नग असे 10 मीटर वायर दि. 18.12.2021 रोजी 00.30 ते 02.00 वा. दरम्यान पारधी पिढी, लोणखस येथील दोन- तीन संशयीत पुरुषांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव ढवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 21 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : खानापूर, ता. परंडा येथील अशोक महादेव गटकुळ यांनी दि. 21.12.2021 रोजी 15.30 ते 17.30 वा. दरम्यान अंगावरी सदरा शेतातील शेडमध्ये अडकवला असता दरम्यानच्या काळात गावातील एका संशयीताने शेडमध्ये जाउन त्या सदऱ्याच्या खिशातील 4,500 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक गटकुळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web