चोरीच्या तीन मोटरसायकलसह आरोपी गजाआड 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी 
 
s

धाराशिव  - चोरीच्या तीन  मोटारसायकलसह आरोपी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/  हुसेन सय्यद, पोलीस नाईक/ अमोल चव्हाण, अशोक ढगारे, पोलीस अमंलदार/ बलदेव ठाकूर, रविंद्र आरसेवाड, महिला पोलीस अमंलदार रंजना होळकर,  चालक पोलीस अमंलदार- नागनाथ गुरव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 


फिर्यादी नामे बाबासाहेब दिंगाबर वाघमारे, रा. शिंगोली, मा.जि. उस्मानाबाद यांनी पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर येथे त्याच्या मालकीची अंदाजे 15,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्पेल्डंर प्लस मोटरसायकल एमएच 25 एस 1809 ही दि. 30.04.2023 रोजी दर्गा परिसर उस्मानाबाद येथे लावलेले असताना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या फिर्यादी बाबासाहेब वाघमारे यांनी दि.04.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे गुरनं 148/2023 भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच फिर्यादी नामे -शुभम बालाजी परदेशी रा. ढोकी ता. जि. उस्मानाबाद यांची  अंदाजे 35,000₹ किंमतीची बजाज सिटी 100 मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 8131 ही दि. 01.05.2023 रोजी बेंबळी येथील  स्वामी समर्थ पेट्रोलपंपा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या फिर्यादी शुभम परदेशी यांनी दि.05.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे गुरनं 137/2023 भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हे माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत सांजा गावात आले असता त्यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ईसम नामे- अविनाश उर्फ अनिल अशोक चव्हाण, रा. एकंबी तांडा, ता. औसा जि. लातुर यांने उस्मानाबाद जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्या असुन तो सध्या एकंबी तांडा येथे आहे. वगैरे बाबत मिळाल्या बातमी वरुन स्थानिक गुन्हेशाखा पोलीस पथकाने नमुद आरोपीस दि. 07.09.2023 रोजी 22.00 वा. सु. ताब्यात घेवून त्याचे कडून सखोल तपास करुन वर नमुद गुन्ह्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 02 चोरीच्या मोटरसायकल व बोहर जिल्ह्यातील चोरीची 01 मोटरसायकल त्याचे ताब्यातुन जप्त केल्या.  

            सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/  हुसेन सय्यद, पोलीस नाईक/ अमोल चव्हाण, अशोक ढगारे, पोलीस अमंलदार/ बलदेव ठाकूर, रविंद्र आरसेवाड, महिला पोलीस अमंलदार रंजना होळकर,  चालक पोलीस अमंलदार- नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे. 

From around the web