तामलवाडी चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी अटकेत

 
s

तामलवाडी : स्मार्टफोन चोरी संबंधी तामलवाडी पोलीस ठाणे येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार गुन्हा नोंद क्र. 128 / 2021 हा दाखल आहे. तपासादरम्यान तामलवाडी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी सपोनि- पंडीत यांच्या मार्गदर्शनाखालील पाहेकॉ- आनंद गायकवाड, पोना- खुणे, पोकॉ- शेख पथकाने सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने तो स्मार्टफोन शोधण्याचा प्रयत्न केला. यावर तो स्मार्टफोन पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील महेंद्र नाना पवार, वय 22 वर्षे याच्या जवळ असल्याचे स्पष्ट होताच पथकाने त्यास सोलापूर जिल्ह्यातून दि. 12.12.2021 रोजी चोरीच्या स्मार्टफोनसह ताब्यात घेतले आहे.


चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उमरगा  : हंद्राळ (के.), ता. बसवकल्याण येथील अर्चना विजयानंद नाटेकर या दि. 09.12.2021 रोजी 15.00 ते 15.30 वा. दरम्यान तलमोड- तुरोरी असा ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 आर 6546 ने प्रवास करत होत्या. दरम्यान वाहनातील एका अनोळखी स्त्रीने नाटेकर यांच्या जवळील 50 ग्रॅम सुवर्ण दागिने व 9,000 ₹ रक्कम असलेली पर्स नाटेकर यांच्या नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या अर्चना नाटेकर यांनी दि. 12 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद महसुल विभागाचे पथक दि. 12.12.2021 रोजी 11.30 वा. सु. गस्तीस असतांना टिप्पर क्र. एम.एच. 25 यु 5295 हा अवैधरित्या मुरुम वाहून नेतांना आढळला. यावर पथकाने त्या टिप्परच्या अज्ञात चालकास वाहन थांबवण्यास सांगीतले त्याने धावत्या टिप्पर मधून चोरीचा मुरुम रस्त्यावर टाकण्यास सुरवात केली. यावेळी पथक त्या टिप्पर चा पाठलाग करतस असतांना टिप्पर चालकास पकडूनये यासाठी मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 6687 च्या अज्ञात चालकाने मोटारसायकलद्वारे पथकाच्या वाहनासमोर अडथळा निर्माण केला. यावरुन मंडळ अधिकारी- नारायण नागटिळक यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह खाणि आणि खनिजे अधिनियम कलम- 21 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web