उस्मानाबादेत चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी अटकेत
उस्मानाबाद : स्मार्टफोन चोरीस गेल्यावरुन कळंब पो.ठा. येथे गु.र.क्र. 295/ 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दाखल होता. उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याच्या पोउपनि- किरवाडे यांच्या पथकाने तांत्रिक अभ्यास केला असता या गुन्ह्यातील चोरीस गेलेला स्मार्टफोन हा भुम येथील वाहिद मोगल याच्याकडे असल्याचे निदर्शनास आले. या प्राप्त माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. माने, पोना- चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मारलापल्ले, मोरे, गोरे यांनी भूम येथून दि. 13 सप्टेंबर रोजी चोरीच्या स्मार्टफोनसह वाहिद मोगल यास ताब्यात घेउन त्यास भूम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रात्रगस्ती दरम्यान अटकेत
उस्मानाबाद : परंडा पो.ठा. येथील गु.र.क्र. 205 / 2020 या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी बिभिषन नाना काळे, रा. पारधी पिढी, ढोकी याचा पोलीस वर्षेभरापासून शोध घेत असल्याने अटक टाळण्याच्या उद्देशाने बिभिषन हा आपले वास्तव्य लपवून होता. तो गावी आल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. माने, पोना- चव्हाण, सय्यद, पोकॉ- आरसेवाड, मारलापल्ले यांच्या रात्र गस्त पथकास दि. 14 सप्टेंबर रोजी पहाटे मिळाली. पथकाने तात्काळ ढोकी येथून त्यास ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद : सुरज भालेराव, रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दि. 13 सप्टेंबर रोजी येडशी स.द. रुग्णालयासमोरील रस्त्यावर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 16 बाटल्या व 20 लि. गावठी दारु बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले. तर वकील शेख, रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे गावातील नादुर्गा कठड्यासमोर 8 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल
बेंबळी : अत्रेश्वर बालाजी इंगळे, रा. कनगरा, ता. उस्मानाबाद हा दि. 13 सप्टेंबर रोजी 11.30 वा. सु. गावातील जि.प. शाळेसमोरील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत विनाकारण आरडा- ओरड करुन सार्वजनिक शांतता भंग करत असतांना बेंबळी पो.ठा. चे पोना- रविकांत जगताप यांना आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.