पोलीस गस्तीदरम्यान चोरीच्या मिनीट्रकसह आरोपी ताब्यात

 
x

परंडा : परंडा पो.ठा. चे पोनि- श्री. सुनिल गिड्डे यांहस पोना- खोसे, पायाळे, रोटे, पोकॉ- शेख,  गायकवाड यांचे पथक दि. 2410.2021 रोजी हद्दीत गस्तीस असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडनेर ग्रामस्थ- विठ्ठल शहाजी खांडेकर हा गेल्या काही दिवसांपासून एम.एच. 13 या बनावट नोंदणीचा एक टाटा मिनीट्रक वापरत आहे. यावर पथकाने वडनेर येथे जाउन खांडेकर कडे त्या वाहनाचा ताबा- मालकी बाबत चौकशी केली असता तो पोलीसांना समाधानकारक माहिती देउ न शकल्याने पथकाचा संशय बळावला. यावर पथकाने त्या वाहनाच्या इंजीन- सांगाडा क्रमांकाच्या आधारे परिवहन विभागाकडून तांत्रीक माहिती घेतली असता त्या वाहनाचा खरा नोंदणी क्र. एम.एच. 42 बी 4509 ते वाहन चोरीस गेल्यावरुन वाहन मालक- अरुण खंडू भागवत, रा. कुरकुंभ, ता. दौंड यांनी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असल्याचे समजले. यावर पथकाने दौंड पोलीसांशी संपर्क साधून चोरीच्या वाहनासह खांडेकर यास दौंड पोलीसांच्या ताब्यात दिल आहे.
 
दरोड्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपी अटकेत

परंडा : परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 395, 34 हा गुन्हा क्र. 25 / 2018 नोंद असून यातील महिला आरोपी- चंदा कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी, ता. भूम यांचा पोलीस गेली 3 वर्षापासून शोध घेत होते. तपासादरम्यान त्या गावी आल्याची माहिती पोलीसांना मिळताच त्यांना दि. 25.10.2021 रोजी राहत्या परिसरातून ताब्यात घेतले आहे.

From around the web