परंड्यात चोरीच्या मालासह आरोपी अटकेत

 
s

परंडा  : इकबाल शेख, रा. परंडा यांनी त्यांचा ॲपेरिक्षा तहसील कार्यालय, परंडा समोरील रस्त्याबाजूस लावला असता दि. 21.09.2021 रोजी रात्री 02.35 वा. सु. त्या ॲपेरिक्षाचे स्टेफनीचे चाक अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. यावरुन परंडा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 321 / 2021 हा 379 नुसार नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान परंडा पो.ठा. च्या पोनि- श्री. सिुनिल गीड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पोना- किरण हावळे, बळी शिंदे, मुल्ला यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बारामती येथील- संतोष खंडू जमदाडे यास दि. 21 ऑक्टोबर रोजी बारामती येथून अटक करुन गुन्हा करण्यास वापरलेल्या ॲटोरिक्षासह चोरीचा माल जप्त केला आहे. 
 

चोरीच्या वाहनासह आरोपी ताब्यात

परंडा  : राहुल कुंडलीक सावंत, रा. लोहारा, ता. परंडा यांनी त्यांचा महिंद्रा बोलोरो पिकअप क्र. एम.एच. 45 टी 1590 हा त्यांच्या घरासमोर लावलेला दि. 20 ऑक्टोबर रोजीच्या रात्री 23.30 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेला होता. यावरुन परंडा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 343 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार नोंदवला आहे. यावरुन परंडा पोलीसांनी गतीमान पावले उचलून सोशल मिडीयावर तसेच उस्मानाबाद जिल्हा शेजारील सोलापूर, लातूर, बीड या जिल्ह्यांना नमूद चोरीच्या वाहनाची माहिती प्रसारीत केली होती. यातून उस्मानाबाद पोलीसांकडून प्राप्त माहितीच्या विश्लेषनावरुन बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाणे हद्दीत ते वाहन संबंधीत पोलीसांना आढळले. तसेच त्या वाहनाद्वारे त्या हद्दीतही चोरीचा गुन्हा केला असल्याने त्या वाहनासह आरोपीस केज पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

                                                                                         
चोरीच्या दोन घटना 

उस्मानाबाद  : जिवन प्रभाकर केसकर, रा. खानापुर, ता. उस्मानाबाद यांच्या खानापुर येथील शेतातील सोयाबीन 6 पोती व स्मार्टफोन दि. 21 ऑक्टोबर रोजीच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या जिवन केसकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
तुळजापूर : राजेश शांताप्पा पडनुर, रा. तुळजापूर यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर लावलेली त्यांची स्विफ्ट कार क्र. एम.एच. 25 आर 3750 ही दि. 20- 21 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजेश पडनुर यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web