चोरीच्या क्रुझर व पिकअप वाहनासह आरोपी अटकेत

 
s

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील वाहन चोरीचा छडा लावण्याकामी स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- अरब, पोना- अमोल चव्हाण, बबन जाधवर, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड यांचे पथक कार्य करत होते. पथकाने दि. 18.01.2022 रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दिलावरनगर, बीड येथील शेख अब्दुल रहीम अब्दुल करीम यास एक पिकअप व एक क्रुझर वाहनासह ताब्यात घेतले. नमूद दोन्ही वाहनांच्या मालकी- ताबा या विषयी तो पथकास समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पथकाने त्या दोन्ही वाहनांच्या सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रीक तपास केला असता ती दोन्ही वाहने कळंब पो.ठा. हद्दीतून चोरीस गेली असल्याने कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंद क्र. 412 / 2021 व 24 / 2022 हे दोन गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

उमरगा  : जकेकुर शिवारातील गट क्र. 165/2 मधील शेत विहीरीतील लाडा कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 06- 07.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या कमलाकर रावसाहेब पाटील, रा. तुरोरी, ता. उमरगा यांनी दि. 17 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : पन्हाळवाडी शिवारातील अहमदनगर रस्त्यालगतच्या सिध्देश्वर पेट्रोलियम विक्री केंद्राच्या भुमीगत डिझेल टाकीतील 1,480 लि. डिझेल दि. 17.01.2022 रोजी 12.15 ते 03.00 वा. दरम्यान दोन अनोळखी पुरुषांनी उपसून चोरुन नेले. अशा मजकुराच्या पेट्रोल पंप व्यवस्थापक- प्रेमराज बरकडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : रामकुंड, ता. वाशी येथील बापु किसन कदम यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 6578 ही दि. 16.01.2022 रोजी 14.30 ते 15.00 वा. दरम्यान वाशी येथील साप्ताहीक बाजार परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बापु कदम यांनी दि. 17 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : नेहरु चौक, उस्मानाबाद येथील मुनीर बशीर शेख यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 7516 ही दि. 29.12.2021 रोजी 19.00 वा. सु. उस्मानाबाद येथील छ. शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मुनीर शेख यांनी दि. 17 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web