चोरीच्या सहा मोटारसायकलसह आरोपी अटकेत

उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातून मोटारसायकलीच्या चोऱ्या करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 
 
d

उस्मानाबाद : उस्मानाबाद तसेच पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरून त्याची विक्री करणाऱ्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. 

विविध गुन्ह्यातील आरोपीच्या शोधार्थ स्था.गु.शा. चे पोनि- . गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. पवार, पोहेकॉ- कवडे, काझी, शेळके, पोना- घुगे, पोकॉ- सर्जे, जाधवर, कोळी यांचे पथक दि. 14 सप्टेंबर रोजीच्या पहाटे येरमाळा येथे गस्तीस होते. दरम्यान त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक तरुण येरमाळा येथील मोटारसायकल संशयीतरित्या बाळगुन आहे. यावर पथकाने येरमाळा- बीड महामार्गालगतच्या एका बंद असलेल्या रसायन निर्मीती कारखान्यामागे छापा टाकून त्या  संशयीतास  ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याचे नाव- योगेश अरुण कसबे, वय- 24 वर्षे, रा. हदगाव, ता. केज असल्याचे समजले. 

यावेळी त्याच्या ताब्यात आढळलेल्या 6 मोटारसायकलच्या मालकी- ताबा विषयी विचारपुस केली असता तो पोलीसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत नसल्याने पथकाने वाहनांच्या सांगाडा व इंजीन क्रमांकावरुन शोध घेतला असता त्यातील 4 मोटारसायकल या पुणे जिल्ह्यातून चोरीस गेल्याने 4 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरीत 2 मो.सा. या सुध्दा चोरीच्या असाव्यात असा पोलीसांना संशय असून उर्वरीत तपासकामी त्यास मोटारसायकलसह येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 
चोरीच्या वायरसह आरोपी अटकेत

d

शेतातील कुपनलीकेची विद्युत वायर चोरीस गेल्यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 310 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत तपासास आहे. तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री माने, पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- मारलापल्ले, आरसेवाड, कोळी यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चिंचोली, ता. तुळजापूर येथील लखन राजेंद्र भोसले या 19 वर्षीय युवकास ताब्यात घेउन चोरीतील वायर जप्त केली असून त्यास तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

From around the web