उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातून आरोपी फरार

 
d

उस्मानाबाद : सुंभा, ता. उस्मानाबाद येथील अजय व सुनिल श्रावण शिंदे उर्फ काळ्या, या दोघा भावांस बेंबळी पोलीसांनी घरफोडीच्या गुन्हा क्रमांक- 210/ 2021 मध्ये अटक करुन उस्मानाबाद न्यायालयात काल दि. 16.01.2022 रोजी सादर केले होते. त्यांस न्यायालयीन कोठडीकामी उस्मानाबाद कारागृहात ठेवण्याचा आदेश झाल्याने कारागृहात भरती करण्यापुर्वी त्यांची उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 13.45 वा. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. यावेळी सुनिलच्या स्वाक्षरी व अंगुलीमुद्रेचा ठसा घेण्याकामी त्याची हातकडी पोलीसांनी काढली असता तो पोलीस हेडकॉन्स्टेबल- अभिमन्यु घोडके यांच्या हातातून आपला हात झटका देउन सोडवून फरार झाला. 


व्हॉट्सॲपवर बनावट अश्लील छायाचित्र पाठवून बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद : एका भ्रमणध्वनी धारकाने जिल्ह्यातील एका 30 वर्षीय महिलेच्या (नाव- गाव गोपनीय) छायाचित्रात छेडछाड करुन त्यास अश्लील बनवून त्या महिलेस दि. 15.01.2022 रोजी व्हॉट्सॲपद्वारे पाठवून तीच्या बदनामीचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 292, 500, 501, 509 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67 (ए) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web