तुळजापूरजवळ अपघात, एक ठार , एक जखमी 

 
crime

तुळजापूर  : आरळी (खु), ता. तुळजापूर येथील- विजय महादेव लोहार, वय 65 वर्षे, हे दि. 12.02.2023 रोजी 13.30 ते 13.45 वा. सु. बसस्थानक तुळजापूर समोरील तुळजापूर ते लातूर जाणारे रोडवर मोटार सायकलवर बसून जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन क्र एमएच. 13 डीक्यु 1782 ही निष्काळजीपने चालवल्याने विजय यांच्या मोटर सायकलला पाठीमागून धडक दिली. यात विजय हे गंभीर जखमी होउन मयत झाले. तर आलका विजय लोहार ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- सचिन विजय लोहार यांनी दि. 13.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

किराणा दुकानाला आग 

भूम  : प्रमोद चोखोबा कांबळे रा लक्ष्मीनगर ता. भुम यांचा गावकरी  स्वप्नील हावळे यांने दि. 12.02.2023 रोजी .02.00 वा. सु. प्रमोद चोखोबा कांबळे यांच्या रविंद्र शाळेजवळ लक्ष्मीनगर येथील किराणा दुकानाला नुकसान होण्याचे दृष्ट उद्देशाने आग लावून जाळून टाकले यात प्रमोद यांचे अंदाजे 2,00,000 ₹ चे नुकसान झाले. अशा मजकुराच्या प्रमोद कांबळे यांनी दि. 13.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web