बेंबळीजवळ अपघात, एक ठार 

 
crime

बेंबळी  : पाटोदा, ता. उस्मानाबाद येथील- भास्कर अंबऋषी साठे, वय 56 वर्षे, हे दि.06.02.2023 रोजी 23.30 वा. सु.तुळजापूर ते पाटोदा रोडवर गणराज पेट्रोलपंपा समोर करजखेडा शिवार येथे रस्त्याने पायी जात होते. 

दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपने चालवलवून भास्कर यांना पाठीमागून धडक दिली. यात भास्कर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. . या अपघातानंतर नमूद अज्ञात वाहनाचा चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- विश्वजीत पदमाकर साठे यांनी दि.07.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184,134(अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 उमरगा : भिकार सांगवी, ता. उमरगा येथील- शिवराज जाधव यांनी दि.06.02.2023 रोजी 22.30 वा.सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल  क्र.एम.एच.25 जे 4903 ही छत्रपती शिवाजी कॉलेज समोर उमरगा येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

 
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल 

तुळजापूर : बुह्राणपुर ता. अक्कलकोट येथील- आनंद बनसोडे यांनी दि.07.02.2023 रोजी 11.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ओमणी कार  क्रं. एम.एच.13 एसी. 6673 ही तुळजापूर येथे सावरकर  चौकात सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तुळजापूर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web