बेंबळीजवळ अपघात :  शेतकऱ्याचा मृत्यू 

 
crime

बेंबळी  : पाडोळी, ता. उस्मानाबाद येथील- विश्वनाथ शिवराम आडसुळ, वय 57 वर्षे हे दि.04.06.2023 रोजी दुपारी 05.30 ते 06.30 वा. सु. उस्मानाबाद ते औसा रोडवर समुद्रवाणी शिवार नेताजी पाटील यांचे शेताजवळ पायी जात होते. 

दरम्यान वाहन क्र एम एच 24 एयु 6341 चा चालक नामे अभिमन्यु क्षिरसागर रा. शिवली, ता. औसा यांनी त्यांचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून विश्वनाथ यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात विश्वनाथ हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- महेश विशवनाथ आडसुळ यांनी दि.05.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 304 (अ) सह कलम 184, 134 (अ) (ब) मो. वा. का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

परंडा  : एका गावातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि.29.03.2023 ते 05.06.2023 रोजी पावेतो सदर मुलगी ही रस्त्याने एकटी जात असताना गावातील एका तरुणाने सदर मुलीगी ही एकटी असल्याचा फायदा घेवून माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे असे म्हणून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-376(2) (I), 376(2)(f), 376(2)(एन), सह पोस्को  कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web