दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद 

24 तासात घरफोडीचा पर्दाफाश
 
as

धाराशिव  - दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 14 वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीस  स्थानिक गुन्हे शाखेने  जेरबंद करून  24 तासात एका  घरफोडीचा पर्दाफाश केला आहे. 

सोनेगाव ता. जि. उस्मानाबाद हा.मु. येडशी ता. जि. उस्मानाबाद येथील- संजय हनुमंत गोफणे, वय 38 वर्षे, यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची हिरो कंपनीची काळे रंगाची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 09 इइ 0747 ही दि. 23.08.2023 रोजी 22.00 ते दि.24.08.2023 रोजी 06.00 वा. सु. संजय गोफणे यांचे राहते घराच्या समोरुन चोरुन नेली होती. तसेच गावातील पोपट बाबुराव गव्हार रा. गव्हारवस्ती येडशी ता. जि. उस्मानाबाद यांचे घरातुन सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे बोरमाळ, झुमके व रोख रक्कम 5,000₹ असे एकुण 50,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या फिर्यादी संजय गोफणे यांनी दि.30.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे गुरनं 258/2023 भा.दं.वि.सं. कलम- 457,380, 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हे मालाविषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत अंबेजवळगा येथे आले असता त्यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ईसम नामे- दिपक तुकाराम शिंदे एरंडगाव अचानकतांडा ता. जि. जालना ह.मु. कारी ता. बार्शी जि. सोलापूर हा संशयीतरित्या एक मोटारसायकल बाळगून असून तो कारी बसस्थानक येथे थांबलेला आहे. यावर पथकाने दिपक शिंदे यास कारी बस स्थानकातून नमूद मोटारसायकलसह दि. 01.09.2023 रोजी 17.10 वा. सु. ताब्यात घेतले व त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्यांने सागिंतले की, आठ दिवसा पुर्वी येडशी येथील एका घरातुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम मी व सोबत इतर चार असे मिळून चोरी केली असुन सदरची मोटर  सायकल ही आम्ही पाच जणांनी मिळून सोनेगाव ता. उस्मानाबाद येथुन एका घरासमोरुन चोरी केल्याचे समजताच पथकाने त्याच्या ताब्यातील ती मोटारसायकल हस्तगत केली. 

सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पुढील अन्य साथीदारंचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच नमुद आरोपी हा पोलीस ठाणे मुर्तीजापुर शहर  जि. अकोला गुरनं 72/2009 कलम 395 या गुन्ह्यामध्ये 14 वर्षा पासून फरार होता व पोलीस ठाणे सिंधखेड राजा जि. बुलढाणा गुरनं 154/2019 कलम 324, 323,34 भा.द.वि. सह कलम 4/25 आर्म ॲक्ट या गुन्ह्यामध्ये मागील चार वर्षापासून फरार होता.

            सदरची कामगीरी . पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि-  ओहोळ, पोलीस हावलदार-विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, पोलीस नाईक-बबन जाधवर, पोना- नितीन जाधवर,चालक पोलीस अंमलदार- महेबुब आरब, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे. 

जालना येथील दुहेरी खुन प्रकरणातील आरोपीच्या स्था‍निक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

दि.31/08.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की, जालना जिल्ह्यातील पोलीस ठाणे सेवली गुन्हा रजि नं. 133/2022 भा.द.वि कलम 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 मधील या दुहेरी खुन प्रकरणातील आरोपी नामे सुधाकर तुकाराम शिंदे, वय 43 वर्षे, रा. एरंडगाव, अचानक तांडा, जि. जालना हा स्व:ची ओळख व नाव लपवून रवी या नावाने कारी, ता. बार्शी, जि. सोलापूर या ठिकाणी राहत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करुन सदर ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेवून जालना पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

      सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- ओहोळ, पोलीस हावलदार-विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, पोलीस नाईक-बबन जाधवर, पोना- नितीन जाधवर,चालक पोलीस अंमलदार- महेबुब आरब, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

                                               

 

          

From around the web