तुळजापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण 

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर तालुक्यातील एक 17 वर्षीय मुलगी दि. 11.11.2021 रोजी सायंकाळी 19.30 वा. घराबाहेर पडली. ती घरी न परतल्याने तीचे कोणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 12.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

वाशी  : घोडकी, ता. वाशी येथील महादेव शिंदे, दिपक शिंदे, अजय शिंदे, अमोल शिंदे या सर्वांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 12.11.2021 रोजी 19.00 वा. सु. भाऊबंद- सुभाष सुखदेव शिंदे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुभाष शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

बेंबळी  : माकणी, ता. लोहारा ग्रामस्थ- आबासाहेब बब्रुवान लोभे, वय 39 वर्षे हे दि. 10.11.2021 रोजी 23.00 वा. सु. तोरंबा फाटा येथील रस्त्याकडेला थांबले असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- शिवाजी लोभे यांनी दि. 12.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

                                                                                    

From around the web