उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या 

इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट खाते तयार करून अश्लील चॅट 
 
s

अंबी  - फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट खाते तयार करून मुलांशी अश्लील चॅट करणारे शूरवीर कमी नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणास अश्या एका प्रकरणात पोलिसांनी बेड्या  ठोकल्या आहेत. 

एका तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर दोन बनावट खाती उघडून अनेक तरुणांशी अश्लील संवाद साधला जात होता. यातुन त्या मुलीची बदनामी होत असल्याने तीने अंबी पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 419 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) अंतर्गत गुन्हा क्रमांक 132 / 2021 हा नोंदवला. सदर गुन्ह्या तपास हा इंटरनेटशी संबंधीत असल्याने या गुन्ह्याच्या तपासकामी सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांची मदत घेण्यात आली. सायबर पोलीसांनी इंस्टाग्रामशी संपर्क साधून त्या खात्यांची माहिती घेतील असता त्या खात्यांच्या वापरकर्त्याशी संबधीत दोन भ्रणमध्वनी क्रमांक प्राप्त झाले.

या माहितीच्या आधारे व कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पो.ठा. चे पोनि-  गिड्डे व अंबी पो.ठा. चे सपोनि-  आशिष खांडेकर यांसह पोहेकॉ- गजानन मुळे, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- सतीश राऊत यांच्या पथकाने त्या ठिकाणी म्हणजे रोहकल, ता. परंडा येथे जाउन चौकशी केली असता दिगंबर हनुमंत कांबळे, वय 19 वर्षे हा तरुण त्याच्या वडीलांच्या व मामाच्या नावे असलेल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर करुन ती इंस्टाग्रामवर खाती हाताळात असल्याचे समजले. यावरुन पथकाने त्यास ताब्यात घेउन गुन्ह्यात वापरलेला भ्रमणध्वनी जप्त केला आहे. 

From around the web