धाराशिवमधील तरुणी ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकली आणि लागला १५ लाखाला चुना ...
धाराशिव : धाराशिवमध्ये ऑनलाइन गेमच्या नादात अनेकांची फसवणूक झाली आहे.त्यात ग्रीनलॅन्ड शाळेजवळ राहणारी एक तरुणीऑनलाइन गेमच्या जाळ्यात अशीच अडकली आणि या गेमच्या नादात १५ लाख गमावून बसली.
शहरातील ग्रीनलॅन्ड शाळेजवळ राहणाऱ्या शिवानी उदयसिंह निंबाळकर यांच्या हॉटसअपवर मोबाईल क्रमांक 212695-910660 च्या धारकाने मॅसेज करुन व टेलीग्राम ग्रुपला ॲड करुन जास्त पैसे मिळतील असे आमीष दाखवून टेलीग्राम ग्रुपवर वेगवेगळे टास्क देवून शिवानी यांनी वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवण्याचे मेसेज देवून पैसे पाठवण्यास सांगुन त्यांची व त्यांचे भावाची 14,97,000 ₹ ऑनलाईन फसवणुक केली.
याप्रकरणी सायबर पोलिसांकडे शिवानी निंबाळकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34, 66 (डी) मा.तं. कायदा अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
नळदुर्ग : नंदगाव, ता तुळजापूर येथील- मनोज गुड्डे, शुभम गुड्डे, महानंदा गुड्डे या तिघांनी शेत जमीन विकल्याचे कारणावरुन दि.30.05.2023 रोजी 21.00 वा. दरम्यान रमाकांत पाटील यांचे कोठ्यावर नंदगाव शिवार येथे गावकरी-मल्लीनाथ सिध्दाप्पा गुड्डे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहान करुन उजवा हात मोडला आहे. अशा मजकुराच्या मल्लीनाथ गुड्डे यांनी दि.31.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-325, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : बरमाचीवाडी, ता. कळंब येथील- विकास महाजन, विष्णु महाजन, अक्षय महाजन, हनुमंत महाजन, महादेव महाजन या सर्वांनी दि.29.05.2023 रोजी 19.30 वा. दरम्यान बरमाचीवाडी येथे गावकरी-इंद्रजीत वसंत बाराखोते यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहान करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या इंद्रजीत बाराखोते यांनी दि.29.05.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.