उस्मानाबादेत शिक्षकाने केला शिक्षकाचा खून 

 
crime

उस्मानाबाद  : उस्मानाबाद शहरातील कुरणेनगर भागात  एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला आर्थिक देवाण - घेवाण मधून बेदम मारहाण केली. त्यात त्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

आर्थीक व्यवहारच्या कारणावरुन भागीरथ कॉलनी, उस्मानाबाद येथील- शामराव उत्तमराव देशमुख, वय 54 वर्षे, यांना दि. 21.02.2023 रोजी 18.15 वा. सु.कुरणे नगर उस्मानाबाद येथील - धिरज बाबु हुंबे यांनी आपल्या राहात्या घरा समोर शामराव यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करुन खुन केला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- वैष्णव शामराव देशमुख यांनी दि.21.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मयत शामराव उत्तमराव देशमुख हे शहरातील भोसले हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.  हुंबे यांची चांगली मैत्री होती. पण आर्थिक देवाण घेवाण मधून वाद झाला , त्यातून हाणामारी झाली आणि जीव गमवावा लागला. 

वाशीत हाणामारी 

वाशी : वाशी,ता. वाशी  येथील- विजय लिंबराज कवडे हे दि.15.02.2023 रोजी 20.30 वा.सु. स्वत:चे घरी असताना गावकरी- अमृता कवडे, निखील उंदरे, गोविंद उंदरे, यांनी कौटुंबिक वादाचे कारणावरून संगणमताने विजय यांना शिवीगाळ करुन काठीने,लोखंडी पायपने मारहाण केली. यात विजय यांचे उजव्या हाताचे करंगळीवर व छातीवर मार लागून जखमी झाले. अशा मजकुराच्या विजय कवडे यांनी दि. 21.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web