शिराढोणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
शिराढोण : एका गावातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) मागील सहामहिन्या पासून घरी असताना गावातील पाच तरुणाने सदर मुलीस ही एकटी असल्याचा फायदा घेऊन तुला व तुझ्या आई, वडील, भावास ठार मारण्याची धमकी देवुन वेळोवेळी तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.20.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, (2)(I), 376, (2) (n), 376 ( 2) (j), 506, सह पोक्सो कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
येरमाळा : शेलगाव (ज), ता. कळंब येथील- हकीम पटेल, सादीक पटेल, सय्यदनुर पटेल, तय्यब पटेल यांनी बांधकामावर विहीरीचे पाणी सोडु नको असे बोलण्याचे कारणावरुन दि.19.05.2023 रोजी 10.00 वा. दरम्यान शेलगाव ज शिवारात गावकरी- सुधीर माधव खुने यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. यात सुधीर यांचा उजवा हात फॅक्चर झाला. तसेच सुधीर यांचे बचावास मंगेश खुने हे आले असता त्यासही कोयत्याने व काठीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुधीर खुने यांनी दि.20.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-326, 324, 323, 504, 506, 34 सह 3(1)(R), 3(1) (S) अ.जा.ज.अप्र.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.