उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 
crime

उस्मानाबाद  : एका गावातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि.08.09.2022 रोजी 00.00 वा. सु. शेजारील गावच्या एका तरुणाने तीचे अपहारण करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि. 18.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 376 (2) (एन), 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 दोन ठिकाणी  हाणामारी 

 उस्मानाबाद  : वाघोली, ता उस्मानाबाद येथील- सिमा अनिल पिपंळे यांचे पती अनिल उत्तम पिंपळे यांनी कौटुंबिक वादाचे कारणावरुन दि.14.02.2023 रोजी .11.00 वा.सु. सिमा व त्यांची सुन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सिमा यांचे घरावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अशा मजकुराच्या सिमा पिपंळे यांनी दि. 18.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 436, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


बेंबळी  : करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील- दिलीप काशीनाथ नागटिळे हे नितीन चव्हाण यांचे शेतात सालगडी म्हणून कामास होते. दि.18.02.2023 रोजी 14.00 वा. सु. नितीन चव्हाण यांच्या शेतातील कसत असलेल्या उसाला पाणी देत असताना शेजारील शेतकरी- विजय इंगळे, लक्ष्मण इंगळे, भैरु इंगळे, व्यंकट इंगळे, खंडु चव्हाण, अन्य 5 यांनी दिलीप यांना तु उसाला पाणी द्यायचे नाही असे म्हणून दिलीप यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तर दिलीप यांना लाथाबुक्यांनी मारहान करुन डोक्यात काठीने मारुन जखमी केले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिलीप नागटिळे यांनी दि. 18.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149 सह अ. जा. ज. अ. प्र. कायदा 3 (1) (आर), 3(1) (एस) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web