हावरगाव येथे एकास बेदम मारहाण
कळंब : जुन्या भांडणाचे कारणावरुन हावरगाव, ता. कळंब येथील- पंढरीनाथ तुकाराम कोल्हे यांना दि. 19.02.2023 रोजी 18.15 वा. सु. हावरगाव येथील प्रकाळे यांचे घराजवळ व हासेगाव शिवारात गावकरी- श्रीकृष्ण कोल्हे व अन्य 4 यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने पंढरीनाथ व त्यांचा मित्र महेश कवडे यांना मारहान करुन ते जात असलेल्या मोटरसायकलला श्रीकृष्ण यांनी त्यांच्या ताब्यातील सफारी गाडी जाणीवपुर्वक अंगावर घालून पाठीमागून धडक देवून जखमी केले. अशा मजकुराच्या पंढरीनाथ कोल्हे यांनी दि.19.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 307,323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घराचे नुकसान
नळदुर्ग : सुलतान वाहिद कुरेशी, रा. सरकारी दावाखान्याचे समोर, नळदुर्ग यांच्या राहते घराची दि.15.02.2023 रोजी 16.00 ते दि. 19.02.2023 रोजी 17.30 वा. पुर्वी बेडरुमची खिडकी तोडून अज्ञात व्यक्तीने. सुलतान यांच्या घराला नुकसान होण्याचे दृष्ट उद्देशाने आग लावून संसार उपयोगी वस्तू जाळून टाकले यात सुलतान यांचे अंदाजे 45,000 ₹ चे नुकसान झाले. अशा मजकुराच्या सुलतान कुरेशी यांनी दि. 19.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 436 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.