कळंबमध्ये चार जिवंत काडतुसासह मॅगझीन लावलेले पिस्टल आढळले 

दोघांना अटक, तिघांवर गुन्हा दाखल 
 
s

कळंब  : कळंब पोलीस ठाण्याचे पथक दि. 06.12.2021 रोजी 01.00 वा. सु. रात्रगस्तीस आसतांना कळंब येथे विनानोंदणी क्रमांकाच्या मोटारसायकलसह एक पुरुष थांबलेला पथकास आढळल्याने त्यांनी त्यास हटकले होते. यावेळी त्याने त्याचे नाव- अरुण रणजितसिंह जमादार, रा. शेळगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी असे सांगीतले. तो पोलीसांना टाळू लागल्याने पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ चार जिवंत काडतुसासह मॅगझीन लावलेले पिस्टल व एक भ्रमणध्वनी आढळला होता. यावर तो पिस्टलाच्या परवान्याविषयी व मो.सा. विषयी माहिती पोलीसांना देउ न शकल्याने त्याच्या जवळील पिस्टलासह काडतुसे, मोसा व भ्रमणध्वनी ताब्यात घेउन त्यास अटक करुन शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक  एम रमेश व कळंब पो.ठा. चे पोनि-  यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि-  अमोल मालुसरे, रामहरी चाटे, पोलीस अंमलदार- विक्रम पतंगे, मिनाज शेख, गणेश वाघमोडे, रवि साळुंखे, खांडेकर, पांचाळ, अशोक कदम, जावळे यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण व तांत्रीक तपास केला. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे अरुण जमादार याचे अन्य दोन साथीदार- उपासना विजयसिंह परिहार व अबरारोद्दीन निजामोद्दीन शेख, दोघे रा. सदर बाझार, अंबाजोगाई यांना दि. 13.12.2021 रोजी अंबाजोगाई येथून अटक करुन त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल, मोटारसायकल, भ्रुमणध्वनीसह 1,30,000 ₹ रक्कम जप्त केली आहे. पथकाने सखोल चौकशी केली असता यात अरुण जमादार याच्या नातेवाईकातील प्रॉपर्टीच्या वादातून त्या तीघांनी पिस्टल व काडतूस जवळ बाळगून जमादर यांच्या नातेवाईकास ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे चौकशीअंती समोर आले. यावरुन नमूद तीघांवर कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 307, 511, 120 (ब), 34 सह शस्त्र अधिनियम कलम- 3, 25, 19 (3) अंतर्गत गुन्हा क्र. 411 / 2021 हा नोंदवला आहे.

तसेच यातील आरोपी- उपासना परिहार यांच्यावर वजिराबाद, नांदेड, अंबाजोगाई (श.) पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी- अरुण रणजितसिंह जमादार याच्यावर पोलीस ठाणे गांधी चौक,लातूर योथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा उर्वरीत तपास पोउपनि- चाटे हे करत आहेत.  

From around the web