जेवळीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले 

 
Osmanabad police

उमरगा  : विनोद बलभिम जाधव, रा. जेवळी (द.), ता. लोहारा हे दि. 23 सप्टेंबर रोजी 12.00 वा. सु. उमरगा येथील एका रुग्णालया जवळ ऑटोरिक्षा लावून हॉस्पिटलमध्ये गेले होते. दरम्यान नवजात अर्भकाची देखभाल टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने एक जिवंत स्त्री अर्भक जाधव यांच्या ऑटोरिक्षात ठेवले. अशा मजकुराच्या विनोद जाधव यांनी दि. 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 317 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

कळंब : कन्हेरवाडी, ता. कळंब येथील अभिमन्यु गोरख हाहे यांनी आदल्या दिवशी त्यांना केलेल्या शिवीगाळीचा जाब गावकरी- संदिप रणजित ओमन यांना विचारला. यावर ओमन यांनी चिडून जाउन हाके यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व त्यांच्या मोटारसायकलवर दगड मारून, जाळून आर्थिक नुकसान केले. तसेच शेतातून रहदारी केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अभिमन्यु हाके यांनी दि. 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : जयमाला ज्योतीराम कवटे, रा. उस्मानाबाद या मुलगा- शिरीष यांसह दि. 23 सप्टेंबर रोजी 19.30 वा. सु. त्यांच्या घरात असतांना गल्लीतीलच माळी कुटूंबातील सुरेश, सुरेखा, शुश्रुत व अन्य एक पुरुष अशा चौघांनी कवटे यांच्या घरात घुसून पुर्वीच्या वादावरुन जयमाला व त्यांचा मुलगा- शिरीष यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. यावेळी जयमाला यांचे पती- ज्योतीराम कवटे हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जयमाला कवटे यांनी दि. 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web