माडजच्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण
उमरगा : महावितरण शाखा, माडज येथील- कनिष्ठ अभियंता- गोपाळ राम जोशी हे दि. 23.06.2023 रोजी 16.00 वा. सु. कनिष्ठ अभियंता महावितरण शाखा माडज कार्यालयात शासकीय काम करत असताना माडज, ता. उमरगा ग्रामस्थ-अजय लिंबाजी मारेकर यांनी आमच्या घराची लाईट बंद आहे असे म्हणून गोपाळ यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून खुर्चीतुन खाली ओडून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. यावरुन गोपाळ जोशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात
तुळजापूर : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 24.06.2023 रोजी 03.00 वा.सु. तुळजापूर पो. ठा. हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान बोरी गावातील गबर कलेक्शन कापड दुकानाच्या पत्रयाचे पाठीमागे ओल सावलीत अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एक इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- गोपाळ बाळू जाधव, वय 30 वर्षे, रा. ढाकणी ता.जि. लातुर असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांला ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.