उमरगा तालुक्यात तोंडावर भोवळ येण्याची पावडर टाकून सोन्याचे दागिने लुटणारी टोळी जेरबंद
मुरूम - उमरगा तालुक्यात तोंडावर भोवळ येण्याची पावडर टाकून सोन्याचे दागिने लुटणारी टोळी जेरबंद करण्यात मुरूम पोलिसाना यश आले आहे. याप्रकरणी आठ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
दि.17.05.2023 रोजी महिला नामे सुमन सुभाष खज्जे, वय 58 वर्षे, धंदा- घरकाम रा. केसर जवळगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद ह्या पोलीस ठाणे मुरुम येथे येवून फिर्याद दिली की, दि. 11.05.2023 रोजी 14.30 वा. सु. पांढऱ्या रंगाच्या मॅजीक सारख्या दिसणाऱ्या वाहनातुन मुरुम मोड ते मुरुम असा प्रवास करत असताना नमुद वाहनामधील दोन ते तीन पुरुष वय अंदाजे 30 ते 35 वर्षाचे त्यातील एकाने सुमन खजजे यांचे तोंडावर कसलीतरी भोवळ येण्याची पावडर टाकुन अंगावरील 25 ग्रॅमच्या सोन्याच्या पाटल्या व 10 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण कि.अं 87,500/- रु किमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुमन खज्जे यांनी दि. 17.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नमुद गुन्ह्याचे तपासकामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मुरुम चे प्रभारी अधिकारी- एम.जी. शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. इंगळे यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला. त्यावर तांत्रिक माहितीच्या आधारे त्या अनोळखी व्यक्तीची माहिती मिळाल्याने व नमुद गुन्ह्यातील वाहन हे झळकी, ता. इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची गोपनीय बातमी दाराकडून बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे सपोनि इंगळे यांनी पोलीस अंमलदारासह सदर ठिकाणी जावून स्थानिक पोलीसांचे मदतीने सदर ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला असता झळकी या ठिकाणी नमुद गुन्ह्यातील आरोपी 1) युनुस रबरब्या काळे, वय 30 वर्षे, रा. बिस्मील्ला नगर मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर, 2) जगदीश धनाजी शिंदे, वय 35 वर्षे, 3) मिनाक्षी टेकचंद काळे, वय 30 वर्षे दोघे रा. सांगवी काटी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद, 4)सुरेखा बाबु भोसले, वय 55 वर्षे, 5) सविता विनोद भोसले, वय 34 वर्षे, 6) काजल नेताजी शिंदे, वय 25 वर्षे 7) सोनाली नरेंद्र शिंदे, वय 25 वर्षे, 8) पदमिनी युनुस काळे, वय 25 वर्षे, आरोपी क्र 4 ते 8 हे सर्व रा. बिस्मील्ला नगर मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर हे वाहनासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, नमुद इसमांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न होवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मुरुम चे प्रभारी अधिकारी- एम.जी. शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. इंगळे पोलीस हवालदार- महानुरे, पोलीस अंमलदार- रणखांब, तोरंबे,परीट, कटोरे, समुद्रे, महिला पोलीस अंमलदार-पंढरे, मुजावर यांचे पथकाने केली.