धाराशिव , तुळजापूर आणि उमरगा येथे हाणामारीचा गुन्हा दाखल  
 

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1) सुनिल यादव कांबळे, 2) निशांत सुनिल कांबळे,3) छोट्याओव्हळ, 4) नितीन सुनिल काबंळे सर्व रा. बौध्दनगर उस्मानाबाद यांनी  माझ्या पोराला का मारले या कारणावरुन  दि.14.08.2023 रोजी 13.00 वा. सु.सरकारी दवाखाना समोरील झेंडा कट्याजवळ उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- आकाश देविदास जगधन, वय 28 वर्षे, रा. बौध्दनगर, उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने व चाकुने मारहाण करुन जखमी केले. तसेच आकाश जगधन यांचे मामा विजय वाघमारे त्यांचे बचावास आले असता त्यासही मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आकाश जगधन यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
तुळजापूर : आरोपी नामे-1) जिवण सर्जेराव वाघ, 2) विनायक बापुराव वाघ रा. शिराढोण, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी कौटुंबिक वादाचे कारणावरुन  दि.14.08.2023 रोजी 19.30 वा. सु.किरण वाघ व सुभाष सोनवणे यांचे घरासमोर शिराढोण येथे फिर्यादी नामे- पांडुरंग नामदेव घुगे, वय 70 वर्षे, रा. शिराढोण, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने व दोन वेळा उचलून आदळले त्यामुळे पांडुरंग यांचे डोक्यास कानाला मार लागून जखमी झाले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पांडुरंग घुगे यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे-1) नितीन रमेश जाधव, 2)गणेश पवार रा. तुरोरी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दारु पिण्यास नकार दिल्याचे कारणावरुन दि.10.08.2023 रोजी 23.00 वा. सु.तुरोरीच्या पुढे हायवे लगत स्वराज्य धाबृयाच्या समोर बाळू लौटे यांचे शेताजवळ फिर्यादी नामे- दिलीप श्रीरंग जाधव, वय 37 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना दारु पिण्यास नकार दिल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डाव्या पायाच्या नडगीवर मारुन जखमी केले. तसेच घरी सांगितलस तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिलीप जाधव यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323,  504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web