परंड्यात गर्भपात व सेक्सच्या गोळ्यांची  विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

 
ds

 परंडा : गर्भपात व सेक्सच्या गोळ्यांची अवैध खरेदी विक्री करणा-या टोळीचा परंडा येथे पोलिसांनी शुक्रवारी (दि.३०) पदार्फाश केला आहे. या घटनेत पोलीसांनी लाखो रुपयांच्या गोळ्या जप्त करुन २ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर बार्शी येथील आकाश ढोबळे यास अटक करण्यात आली आहे.

तांड सोंदणे रोड, बार्शी, जि. सोलापूर आकाश अविनाश ढोबळे, वय 29 वर्षे, सागर दसुडे हे दोघे दि.30.06.2023 रोजी 17.45 वा. सु. बस स्टॅन्ड जवळ रमाई चौक परंडा येथे स्वत:चे कब्जात बेकायदेशीररित्या  एक मारुती सुझुकी इको गाडी  सह 2,00,000₹ किंमतीचे औषधा विना बिलाने खरेदी करुन गर्भपाताच्या सिलडेनाफिल  हे औषधे विक्री करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या श्रीकांत विश्वासराव पाटील रा. जुना उपळा रोड, उस्मानाबाद यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 336, सह औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा कलम 18(क) (अ)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  अपघातात एक ठार 

लोहारा  : भोसगा, ता. लोहारा येथील- रोहीत टोपाजी राठोड, वय 21 वर्षे  हे दि.05.05.2023 रोजी 10.30 वा. सु. दक्षिण जेवळी ते उत्तर जेवळी एमएसईबी समोरच्या रोडवरील पुलावर मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान  रोहीत यांनी जनावरे वाचविण्याच्या नादात मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून पुलाच्या कठड्यास मोटरसायकलची धडक देवून पुलाचे खाली पडून स्वत:च गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या जेवळी दक्षिण, ता. लोहारा येथील- गणेश सिद्राम होनाजे यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                                                

From around the web