परंड्यात गोवंश जणावरांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

परंडा  : अकलुज नाका इंदापूर येथील- अरफात असिफ कुरेशी, अखिल शकील कुरैशी, तर सोमवार गल्ली परंडा येथील- कलीम आत्ताउरहेमान मुजावर यांनी दि 02.06.2023 रोजी 18.30 वा. सु. परंडा ते कुर्डुवाडी जाणारे रोडलगत परंडा येथे सत्तर बाजूस विटाने बांधलेल्या व पत्रे लावलेल्या इलेक्ट्रीक बल्बच्या उजेडात गोवंश जनावरे कापून त्याचे कातडे सोलत असताना वाहतुक शाखाचे पोलीस उप निरीक्षक श्री. राजेंद्रसिंग ठाकुर यांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण  कायदा कलम- 5(क), 9, 9(अ) अंतर्गत परंडा पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे. 

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

धाराशिव  : रातंजन, ता. बार्शी येथील- सुरज तानाजी हजारे यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची टीव्हीएस रेडीऑन मोटरसायकल क्र एमएच 13 डीएच 6897 ही दि.01.06.2023 रोजी 19.00 वा. दरम्यान सांजा रोड लगत इंदीरानगर उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुरज हजारे यांनी दि. 03.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : सोन्नेवाडी, ता. भुम येथील- अर्जुन दत्तु सोन्ने, वय 68 वर्षे हे दि.18.03.2023 रोजी 14.00 वा. सु महालक्ष्मी मंगलकार्यालय पारगाव येथुन अर्जुन यांचे सदऱ्याच्या खिशातुन अंदाजे 35,900 ₹ किंमतीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अर्जुन सोन्ने यांनी दि. 03.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web