सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल
नळदुर्ग : आरोपी नामे-1) मशायक काशीम बागवान, वय 28 वर्षे रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.18.07.2023 रोजी 01.10 वा. सु. एनएच 65 रोडचे बाजूस आझाद नगरटी हाउसचे समोर तर आरोपी नामे 2) किरण दिलीप मिरगे, वय 27 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 01.10वा. सु. एनएच 65 रोडचे बाजूस अमृत तुल्य टी. हाउस चे समोर रस्त्यालगत आपल्या हॉटेल मध्ये गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.वि.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा : आरोपी नामे-1) वसिम इकबाल बागवान, वय 26 वर्षे रा.मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.17.07.2023 रोजी 23.30 वा. सु. एनएच 65 रोडचे बाजूस शेंडगे कॉर्नर जवळ सार्वजनिक रोडवर तर आरोपी नामे 2)विशाल प्रकाश खटके, वय 34 वर्षे, रा. गौतमनगर, उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 23.30 वा. सु. एनएच 65 रोडचे बाजूस शेंडगे कॉर्नर जवळ सार्वजनिक रस्त्यालगत आपल्या हॉटेल मध्ये गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.वि.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
जाळुन नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल
भूम - फिर्यादी नामे-महेबुब युनुस शेख, वय 25 वर्षे, रा. इंदीरानगर, भुम ता. भुम जि. उस्मानाबाद यांचे आलमप्रभु नावाचे मोटार गॅरेज उस्मानाबाद रोड भुम येथे गॅरेज समोर दुरुस्तीसाठी लावलेली रमेश उत्तमराव गपाट रा. इंदापूर यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पियो गाडी जिचा क्र एमएच 14 सी बी 8283 ही दि.17.07.2023 रोजी रात्री 11.57 वा सु. अज्ञात व्यक्तीने नमुद स्कॉर्पियो गाडीला आग लावून जाळून त्याचे नूकसान केले. अशा मजकुराच्या गॅरेज मालक- महेबुब युनुस शेख यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 435 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.