रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 
crime

 परंडा  : आरोपी नामे-1)सुलेमान अल्लाबक्ष पठाण, वय 26 वर्षे, रा. अरणगाव, ता. परंडा  जि. उस्मानाबाद यांनी दि.23.07.2023 रोजी 18.05 वा.सु. राफीया स्टील ॲन्ड हार्डवेअर फॅब्रीकेशन परंडा येथे आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 45 टी 2172 हा तर आरोपी नामे 2) महादेव विठ्ठल सुर्यवंशी  वय 37 वर्षे, रा. डोंजा, ता. परंडा जि. उस्मानाबाद  यांनी याच दिवशी 18.30 वा. सु. देवकर हॉटेल समोर परंडा करमाळा रोड येथे आपल्या ताब्यातील छोटा हत्ती क्र एमएच 45 एजे 2780 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो. ठाणे येथे  स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

ढोकी : आरोपी नामे-1) सुरज राजेंद्र गरड, वय 29 वर्षे, रा. पिनाणी वडगाव, ता. कळंब  जि. उस्मानाबाद यांनी दि.23.07.2023 रोजी 13.30 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक  येथे आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 25 एजे 5306 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

निष्काळजीपने वाहने चालवणाऱ्यावर गुन्हे नोंद

ढोकी  : अरोपी नामे- 1) तुषार बळीराम आदमाने, वय 26 रा.बोरगाव काळे, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.23.07.2023 रोजी 14.00 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक येथे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 24 एक्स 7620 ही ढोकी पेट्रोलपंप चौक येथे रोडवर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना ढोकी पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये ढोकी  पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा  : आरोपी नामेरमजान रजाक शेख, रा. हमीदनगर, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि.23.07.2023 रोजी 18.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही बसस्थानक समोर उमरगा येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web