ढोकीत निष्काळजीपने वाहने चालवणाऱ्यावर गुन्हे नोंद
ढोकी : अरोपी नामे- 1) पवन तानाजी मोरे, वय 31 रा.भडाचीवाडी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.19.07.2023 रोजी 13.15 वा. सु. ढोकी बसस्थानक समोर रोडवर आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 25 ए 6207 ही बसस्थानक येथे, तर आरोपी नामे- 2) आयुब काशीम पठाण, वय 55 वर्षे, रा ढोकी, ता. जि. उस्मानाबाद यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र रस्त्याएमएच 25 एजी 4497 ही याच दिवशी 13.30 वा. सु. बसस्थानक ढोकी येथे, तर आरोपी नामे- 3) नंदकिशोर अनंतराव लांडगे, वय 29 वर्षे, रा. लोदगा, ता.जि. लातुर यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 एए 9169 ही याच दिवशी 14.00 वा. सु. ढोकी बसस्थानक येथे, तर आरोपी नामे 4) देवानंद महादेव वाकुरे, वय 32 वर्षे, रा. रामवाडी, ता.जि. उस्मानाबाद यांनी आपल्या ताब्यातील बोलेरो क्र एमएच 14 डीएम 8705 ही याच दिवशी 15.30 वा. सु. तेर रामवाडी रोडवर, तर -5 ) अंबादास भारत चामे, वय 27 वर्षे, रा. बुक्कनवाडी, ता. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 16.30 वा. सु.छत्रपती शिवाजी चौक तेर येथे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 उव्ही 3299 ही, तर आरोपी नामे-6) ऋषी लक्ष्मण बुरले, वय 22 वर्षे, रा. सुंभा, ता.जि.उस्मानाबादयांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 6359 ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद सातजणाविरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 सह मो.वा.का. कलम 184 अन्वये स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
ढोकी : आरोपी नामे-1)भोलेनाथ गणपत कांबळे, वय 39 वर्षे, रा. साठे नगर, तेर, ता.जि. उस्मानाबाद यांनी दि.19.07.2023 रोजी 17.15 वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 बीडब्ल्यु 6812 ही, तर आरोपी नामे-2) आप्पासाहेब गोविंद, वय 30 वर्षे, रा. गणपती चौक, तेर ता. जि. उस्मानाबाद हे याच दिवशी 18.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यावर आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र.एम.एच. 25 एए 8146 ही रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.दं.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.