उमरग्यात मेडिकल विक्रेत्यांवर गुन्हा दाखल , हे आहे कारण ... 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे- गणेश गोविंदराव माने, आर्या मेडीकल ॲण्ड जनरल स्टोटर्स, शॉप नं जी- 5, हाउस नं. 126 वार्ड, नं 13, विपुल वरटेक्स, आरोग्य नगर, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी 09.06.2023 रोजी 00.01 ते दि. 15.09.2023 रोजी 11.00 वा. सु. आर्या मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स उमरगा येथे निट्रावेट हे औषध द नारकोटीक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रोपिक सब्सटन्स ॲक्ट 1985 च्या शेड्युल 1 मध्ये नमुद असुन ड्रग्ज ॲण्ड कॉस्मेटीक्स ॲक्ट 1940 व रुल्स 1945 नियम 65 नुसार मे. आर्या मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स चे नमुद आरोपी यांनी रेजिस्टरर्ड प्रॅक्टीशनर च्या चिट्टीशिवाय कोणतेही विक्री बिल न देता मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री केलेली असुन नमुद आरोपीने अंदाजे 1,40,000₹ किंमतीच्या 16 प्रकारच्या 5 एमजी निट्रावेटच्या टॅबलेटस विक्री करण्यासाठी ठेवलेल्या मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रीकांत विश्वासराव पाटील, वय 37 वर्षे, व्यवसाय औषधी निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, उस्मानाबाद रा. हरिश्चंद्र नगर, जुना उपळा रोड, उस्मानाबाद यांनी दि.15.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-328, 276 सह कलम 18 (क) व नियम 65(2), 65(3) औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा कलम 1940  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 नळदुर्ग : फिर्यादी नामे- शेषेराव भैरु नागमोडे, वय 38 वर्षे, रा.तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 80,000₹ किंमतीची हिरो होंडा मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 0750 ही. दि. 13.09.2023 रोजी 23.00 ते दि. 14.09.2023 रोजी 05.30 वा. सु. मौजे गुजणूर, ता. तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी शेषेराव नागमोडे यांनी दि.15.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- तानाजी माधु कुंडकर, वय 27 वर्षे, रा.छत्रपती शिवाजी महाराज चौक , ह.मु. आयुर्वेदिक दवाखाना ओम मंगल कार्यालय  जवळ धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 14 एचवाय 8151 ही. दि. 08.09.2023 रोजी 15.00 वा. सु. सांजा गावात जाणारे रोडच्या उजव्या बाजूस धनराज ट्रेडर्सचृया समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी तानाजी कुंडकर यांनी दि.15.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web