दाऊतपूरच्या सरपंचासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

ढोकी  :  शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाऊतपूरचे सरपंच बंकट शिंदे यांच्यासह पाच जणांविरुद्ध ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    दाऊतपूर ता. उस्मानाबाद येथील सरपंच बंकट शिंदे, राजाभाउ शिंदे, सौरभ शिंदे, संपत थोरात, पांडुरंग मदने या सर्वांनी जुन्या वाद उकरुन काढून दि. 07.01.2022 रोजी 12.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर व विठ्ठलरुक्माई मंदीरासमोर ग्रामस्थ- तानाजी लक्ष्मण ठवरे यांसह त्यांच्या भावास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. 


याप्रकरणी तानाजी ठवरे यांनी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताच पोलिसांनी  सरपंच बंकट शिंदे यांच्यासह पाच जणांविरुद्ध भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा येथे हाणामारी 

परंडा  : भिमनगर, परंडा येथील शुभम बाळासाहेब कांबळे हे दि. 06.01.2022 रोजी 21.00 वा. सु. परंडा शिवारातील लक्ष्मीआई मंदीराजवळ थांबले होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर येथील इंद्रजित महाडीक व नितीन महाडीक या दोघांनी जुना वादा उकरुन काढून शुभम कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, चाकु, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शुभम कांबळे यांनी दि. 07 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 आणि ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web