पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उमरगा  : कदेर तांडा, ता. उमरगा येथील काशीनाथ सोमला चव्हाण हे दि. 31.12.2021 रोजी 21.00 वा. सु. उमरगा पोलीस ठाण्याच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत मोठमोठ्याने आरडा-ओरड करुन गोंधळ करत असतांना उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लोकसेवकाच्या शासकीय कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिरढोण : कळंब तालुक्यातील खामसवाडी महावितरण उपकेंद्राचे वरिष्ठ तांत्रीक- किशोर साहेबराव कोकाटे हे दि. 31.12.2021 रोजी 10.30 वा. सु. खामसवाडी येथे विजबील बसुली करणे कामी कर्तव्यावर होते. यावेळी ग्रामस्थ- संजय छगण शेळके यांनी, “ वीज कोण बंद केली, चालू कोण करणार.?” असा जाब विचारुन कोकाटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावरुन किशोर कोकाटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


जुगार विरोधी कारवाई

उमरगा  : जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन उमरगा पोलीसांनी दि. 31.12.2021 रोजी 22.50 वा. सु. नाईचाकूर येथे छापा मारला. यावेळी ग्रामस्थ- चंद्रकांत कांबळे, अमोल पवार, रफिक शेख, दिपक इंगळे, विलास इटकर, मिलींद कांबळे, सिध्देश्वर कांबळे हे सर्व सिध्देश्वर कांबळे यांच्या घराजवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 51,350 ₹ रक्कम बाळगले असतांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्री विरुध्द उमरगा पोलीसांनी दि. 31.12.2021 रोजी 18.00 ते 21.00 वा. दरम्यान हद्दीत 3 ठिकाणी छापे मारले. यात धाकटीवाडी ग्रामस्थ- तानाजी ढोणे हे गाव शिवारात प्लास्टीकच्या घागरीत 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, नाईचाकुर ग्रामस्थ- सचिन कांबळे हे आपल्या घरासमोर 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, कागीवाडी ग्रामस्थ- अमृत टकले हे गुंजाटी शिवारातील औराद फाटा येथे देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले. तर येरमाळा पोलीसांना भोसा, ता. कळंब ग्रामस्थ- फारुक कुरेशी हे आपल्या घरासमोर 4 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना आढळले.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद वय्क्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत उमरगा पो.ठा. येथे 3 व येरमाळा पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.

From around the web