उस्मानाबादेत वीज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद : विद्युत मीटरच्या पाठीमागून तारा जोडून विजयकुमार रावसाहेब साळुंके, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद यांनी त्यांच्या राहत्या घरासह लगतच्या दुकानासाठी जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत वीज चोरी केले असल्याचे महावितरण कार्यालय, उस्मानाबाद येथील भरारी पथकास आढळले. यावरुन सहायक अभियंता- प्रदिप मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वीज अधिनियम कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे तीन गुन्हे दाखल 

कळंब  : दत्तनगर, कळंब येथील बिजेकराम दगडु वरपे हे दि. 02 सप्टेंबर रोजी 11.30 ते 20.30 वा. दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने तोडून घरातील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे पैंजण एक जोड, तीजोरीच्या चाव्या व 27,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : शिवनेरी नगर, उस्मानाबाद येथील बाहुबली देविदास पंडीत हे दि. 02- 03 सप्टेंबर रोजीच्या रात्री आपल्या घरात झोपलेले होते. दरम्यान त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने तोडून घरातील 50 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 1,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : बाबासाहेब हरीबा कुटे, रा. सोनगिरी, ता. भुम हे दि. 02 सप्टेंबर रोजी 12.15 वा. सु. भुम बसस्थानकात वाशी- पुणे बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन बाबासाहेब कुटे यांच्या विजारीच्या पाठीमागील खिशातील 18,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web