येडशीत पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद : येडशी येथील उड्डान पुलाखालील बार्शी रस्त्यावर दि. 26.01.2022 रोजी 16.00 वा. सु.उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल- विजयानंद साखरे हे अवैध वाहतुक संबंधाने कारवाई करत होते. यावेळी येडशी ग्रामस्थ- महादेव पवार यांनी तेथे जाउन, “मी सेवानिवृत्त डिवायएसपी असुन तुम्ही येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांवर केसेस का करता.” असे धमकावून साखरे यांच्या अंगावर धावून, त्यांना धक्का देउन त्यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला.

यादरम्यान साखरे हे कारवाई करत असलेल्या पिकअप वाहनातील चालक- अक्षय हरिश्चंद्र शेळके, रा. पांगरी, ता. बार्शी हे त्यांच्या वाहन- मालकाशी फोनद्वारे बोलत असतांना महादेव पवार यांनी त्यांच्या हातातील फोन घेउन शेळके यांच्या वाहन मालकास अश्लील शिवीगाळ केली.

            यावरुन पाहेकॉ- विजयानंद साखरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 504 अंतर्गत आणि पिकअप वाहन चालक- अक्षय शेळके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 294 अंतर्गत असे दोन गुन्हे उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे दि. 27 जानेवारी रोजी नोंदवले आहेत.

सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : दिगंबर क्षिरसागर, हरिश चांदणे, दोघे रा. उस्मानाबाद व सुनिल राठोड, रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद या तीघांनी दि. 27.01.2022 रोजी 11.10 वा. सु. उस्मानाबाद येथील बस स्थानकसमोरील रस्त्यावर  आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षा हे निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवून भा.दं.सं. कलम- 279 आणि मो.वा.का. कलम- 184 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web