लोहाऱ्यात वीज चोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

लोहारा : चेतनकुमार लक्ष्मण बोंडगे, रा. लोहारा हे गावातील त्यांच्या ‘चेतन बार’ च्या वीज  मीटरमध्ये मागील 5 वर्षांपासून फेरफार करुन महावितरण कंपनीची 1,66,956 ₹ किंमतीची 9,257 युनीट वीज चोरी केली आहे.  यावरुन अतिरीक्त अभियंता- प्रदीप मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भारतीय विद्युत कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लैंगिक छळ

उस्मानाबाद  : एक 20 वर्षी मतीमंद मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 24.11.2021 रोजी 21.00 23.00 वा. दरम्यान तीच्या घरा शेजारच्या शेडमध्ये एकटी झोपली असतांना गावातीलच एका तरुणाने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या त्या मुलीच्या आईने दि. 25 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 376 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उमरगा  : उमरगा तालुक्यातील एक 16 वर्षीय मुलगी दि. 23.11.2021 रोजी 10.00 ते 19.30 वा. दरम्यान तीच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती न मिळाल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 25 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

बेंबळी  : नांदुर्गा, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- मुरहरी, विष्णु खटके यांच्या शेत गट क्र. 191 मधील शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 24- 25.11.2021 दरम्यानच्या रात्री तोडून शेडमधील 42 पोती सोयाबीन व 19 पोती तुरदाळ चोरुन नेली. अशा मजकुराच्या मुरहरी खटके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद - घाटांग्री, ता. उस्मानाबाद येथील शिवाजी शामराव शिंदे यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 2051 ही उस्मानाबाद शहरातील रेल्वे आरक्षण कार्यालयासमोरुन दि. 12.11.2021 रोजी 19.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.

दुसऱ्या घटनेत गोविंदपूर, ता. कळंब ग्रामस्थ- बळीराम भगवान मुंढे यांची हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 6769 ही दि. 24.11.2021 रोजी 14.00 ते 15.15 वा. दरम्यान त्यांच्या शेतातील रस्त्या जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवाजी शिंदे व बळीराम मुंढे  यांनी दि. 25 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत उस्मानाबाद (श.)  व शिराढोन पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

मारहाण 

ढोकी : रामानंद पाटील, रा. संगमनेर, ता. बार्शी हे दि. 23.11.2021 रोजी 17.30 वा. सु. मोटारसायकलने बार्शी- उस्मानाबाद असा प्रवास करत होते. दरम्यान ते  ढेकरी शिवारात आले असता त्यांचे गावकरी- विशाल व बालाजी हागवने यांसह रंगराव पाटील परमेश्वर व कृष्णा गोरे यांनी मोटारसायकलवर येउन रामानंद पाटील यांना आडवले. भुखंड विक्रीचा जुना वाद उकरुन काढून नमूद लोकांनी रामानंद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तलवार, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामानंद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 341, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web