उस्मानाबादेत मद्यधुंद अवस्थेत गोंधळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उदय शाहु आकाडे, रा. काकानगर, सांजा हा दि. 10 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील बांधकाम विभाग निवासस्थान परिसरात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ करत असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

तामलवाडी  : सोलापुर येथील प्रविण बाबुराव खटके व बनसिध्द धोंडिबा कुंभार या दोघांनी दि. 10 सप्टेंबर रोजी 17.00 वा. सु. तामलवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील वाहने रहदारीस धोकादायपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 सास्तुर येथे ग्रामस्थ- धनराज गायकवाड व बाबासाहेब गायकवाड हे दोघे दि. 10 सप्टेंबर रोजी आपापल्या घरासमोर एकुण देशी- विदेशी दारुच्या 56 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर सिंदफळ येथील ग्रामस्थ- अमोल घेवारे हे तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाजवळ देशी- विदेशी दारुच्या 33 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web