समुद्रवाणी येथे कार आणि मोटारसायकलचा अपघात झाला आणि....
बेंबळी : समुद्रवाणी येथे कार आणि मोटारसायकलचा अपघात झाला आणि अपघातग्रस्त वाहनात दोन पिस्तूल मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
समुद्रवाणी येथे उस्मानाबाद ते औसा रस्त्यावर दि. 08 ऑक्टोबर रोजी 06.00 ते 07.00 वा. दरम्यान अर्टीगा कार कार क्र. एम.एच. 06 बीएम 4833 चा व मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ई 5305 चा अपघात झाल्याची बातमी बेंबळी पो.ठा. च्या पथकास मिळाली. यावर बेंबळी पो.ठा. चे सपोनि- श्री. शेंडगे यांसह पथक घटनास्थळी रवाना झाले.
या अपघातात मोटारसायकल वरील वसंत श्रीरंग जाधव, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद व त्यांच्या सोबतचे खंडु पांडुरंग कुंभार, रा. लासोना, ता. उस्मानाबाद हे दोघे गंभीर-किरकोळ जखमी झाले होते. पथकाने त्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून अपघात स्थळावरील नमूद कारची तपसणी केली असता कारमधील चालक सिटच्या मागच्या बाजूच्या कप्प्यात मॅकझीन- काडतुस विरहीत दोन पिस्टल आढळुन आल्या.
यावर ही बातमी वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलीस अधीक्षक श्रीमती नीव जैन व अपर पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद दोन्ही पिस्टल जप्त करुन कार चालक- नरेश तौर, रा. औसा यास अटक केली असून कारमधील त्याच्या अन्य साथीदारांसह पिस्टलाच्या मॅगझीन- काडतूसाचा पोलीस शोध घेत आहेत. सदर प्रकरणी पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 34 सह मो.वा.का. कलम- 134, 184 सह शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा क्र. 171 / 2021 हा नोंदवण्यात आला आहे.
अपघात
येरमाळा : सोमनाथ पंडीत शिंदे, रा. परतापुर, कळंब हा 13 वर्षीय मुलगादि. 05 ऑक्टोबर रोजी 08.00 वा. सु. परतापुर येथील महामार्ग ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यु झाला. या अपघातानंतर अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या बाळु सोना शिंदे, रा. परतापुर यांनी दि. 08 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 सह मो.वा.का. कलम- 177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.