उस्मानाबाद जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलीवर ५५ वर्षाच्या नराधमाच्या अत्याचार 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : एका 55 वर्षीय पुरुषाने त्यांच्या घराजवळून जात असलेल्या गावातीलच एका 7 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) दि. 24 सप्टेंबर रोजी 12.00 वा. सु. चॉकलेट देण्याच्या बाण्याने त्याच्या घराजवळील एका पडक्या घरात नेउन त्या मुलीवर लैंगीक अत्याचार केला. तसेच या अगोदर चार दिवसांपुर्वीही त्या पुरुषाने त्या मुलीवर लैंगीक अत्यार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. 25 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8 ,12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी चोरी 

बेंबळी : सिध्देश्वर पवार, रा. ताकविकी, ता. उस्मानाबाद हे दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या शेतातील पत्रा शेडमध्ये झोपले असतांना शेडसमोरील त्यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 4268 ही पहाटेच्या सुमारास अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या लक्ष्मण सिध्देश्वर पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : उमरगा येथील व्यंकट बाबुराव जाधव हे दि. 25 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. उमरगा येथील एका हॉस्पीटलमध्ये असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन जाधव यांच्या सदऱ्याच्या खिशातील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या व्यंकट जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                 

From around the web