उमरगा तालुक्यात 45 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उमरगा तालुक्यातील एका 45 वर्षीय विवाहीत महिलेस (नाव- गाव गोपनीय) शेजारील गावच्या पुरुषाने फेब्रुवारी 2021 मध्ये पुर्वीच्या वादावरून त्या महिलेस तीच्या बटईने केलेल्या शेतात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच यानंतर ती महिला नोव्हेंबर 2021 महिन्यात आपल्या घरात असतांना दुसऱ्या एका अन्य पुरुषाने तीच्यावर लैंगीक अत्याचार करुन तीला शिवीगाळ केली. बदनामीस भिउन त्या महिलेने या अत्याचाराची वाच्यता केली नाही. परंतु ते दोघे त्या महिलेकडे शरिरसंबंध ठेवण्याची वारंवार मागणी करुन तीला त्रास देउ लागल्याने अखेरीस त्या महिलेने काल दि. 27 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अपहरण 

उस्मानाबाद  : उमरगा तालुक्यातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 26.12.2021 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. आपल्या घरात असतांना गावातीलच तीन स्त्री- पुरुषांनी तीला लग्नाचे अमिष दाखवून तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 27 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

 चोरीचे दोन गुन्हे 

लोहारा: चिंचोली (काटे), ता. लोहारा येथील उध्दव तुळशीराम समुद्रवाणे हे कुटूंबीयांसह दि. 26.12.2021 रोजी 11.00 ते 18.00 वा. दरम्यान आपले घर कुलूप बंद करुन बाहेर गावी गेले होते. दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप कोण्या अज्ञात व्यक्तीने तोडून कपाटातील 7 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 50 ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू व 40,000 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या उध्दव समुद्रवाणे यांनी दि. 27 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा : उस्मानाबाद येथील सुभाष अल्लु राठोड यांची हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 4639 ही दि. 21 - 22.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री उस्मानाबाद येथील आयुर्वेद महाविद्यालयासमोरील रस्त्यावरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुभाष राठोड यांनी दि. 27 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web