रस्ता अपघातात अणदूरच्या तरुणाचा मृत्यू 

 
crime

मुरूम : अणदुर, ता. तुळजापुर येथील- सचिन विश्वनाथ धुमाळ हे दि.05.01.2023 रोजी 18.30 वा.सु. आचारी तांडा येथील रस्त्याने मोटरसायकल क्र. एम.एच. 25 ए जी 1419 ही चालवत जात होते. यावेळी गणेश मोहन राठोड, रा. धानोरी, ता. लोहारा यांनी ट्रॅक्टर क्र. एम.एच.25 ए एल 4691 हा रस्त्याने चुकिच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने सचिन धुमाळ यांच्या मोटरसायकल समोरून धडकला. त्यात सचिन हे गंभीर जखमी  होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे भाउ- अप्पासाहेब धुमाळ यांनी दि.07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


बेंबळी  : महाळंगी, ता. उस्मानाबाद येथील- बळीराम जालींधर जाधव वय 37 वर्षे हे दि.31.12.2022 रोजी 19.00 वा. सु. गावातील आंबेवाडी रस्त्याने जात होते. यावेळी गावकरी- अज्ज‍ि बाबुलाल शेख यांनी ट्रॅक्टर  क्र. एम.एच. 25 ए डब्ल्यु 1887 हा निष्काळजीपने चालवल्याने बळीराम यांना पाठीमागून  धडकल्याने त्यात बळीराम हे गंभीर जखमी  होवून मयत झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या उमेश रावसाहेब लोकरे, रा. बेंबळी यांनी दि.07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184,134(अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

लोहारा  : जेवळी, ता. लोहारा येथील- बालाजी गवळी, गोविंद चव्हाण या दोघांनी दि. 07.01.2023 रोजी 16.40 ते 17.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 23 एन 572 व ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 44 एम 4871 हे लोहारा येथील जिंदावली मोबाईल शॉप समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे करुन तर आचलेर, ता. लोहारा येथील- नरेश पुजारी यांनी ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 23 एक्स 2548 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 03 गुन्हे नोंदवले आहे.

उमरगा  : बेडगा, ता. उमरगा येथील- दतुनाथ चव्हाण यांनी दि. 07.01.2023 रोजी 10.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 25एम 1658 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

 
 मारहाण

तुळजापुर  : शिराढोण, ता. तुळजापुर येथील- विठ्ठल सोनवणे, बबन सोनवणे या दोघा भावांनी मागील भांडणाच्या कारणावरून दि.06.01.2023 रोजी 18.15 वा.सु. शिराढोण ते ढेकरी गावाचे शिवावर गावकरी- सचिन जयकुमार देशमुख यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सचिन देशमुख यांनी दि. 07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web