येरमाळा : भीषण अपघात प्रकरणी दहा दिवसानंतर गुन्हा दाखल 

 
crime

येरमाळा : अज्ञात चालकाने दि. 16.04.2022 रोजी 01.30 वा. सु. येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ट्रक क्र. आर.जे. 19 जीएच 2459 हा निष्काळजीपने चालवल्याने समोरील पिकअपला पाठीमागून धडकला. या अपघातात पिकअपमधील प्रवसी- सचिन भाऊसाहेब काळे, मनिषा राहुल एकशिंगे, मंगल संपत निबोरे हे तीघे मयत झाले तर अतुल निबोरे, भाउसाहेब निबोरे, प्रिती निबोरे, प्रियंका काळे, शिवतेज काळे, अरव काळे, सर्व रा. नागापूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन ट्रकसह पसार झाला. अशा मजकुराच्या अनिल भास्कर निबोरे, रा. नागापूर यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : लातूर येथील शाम मोहन धावारे, वय 35 वर्षे व शिलावती नागेश सगट हे दोघे दि. 15.03.2022 रोजी 11.00 वा. सु. काक्रंबा गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 24 झेड 4942 ने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या समोर धावणाऱ्या पिकअपच्या अज्ञात चालकाने पिकअपचा अचानक ब्रेक दाबल्याने शाम धावारे चालवत असलेली मो.सा. समोरील त्या पिकअपला पाठीमागून धडकली. या अपघातात शाम धावारे हे मयत झाले तर शिलावती सगट या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर संबंधी पिकअपचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शाम यांची आई- जयश्री धावारे यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : अज्ञात चालकाने दि. 25.04.2022 रोजी 21.55 वा. सु. तडवळा (क.) येथील रस्त्यावर बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 8811 ही निष्काळजीपने चालवल्याने समोरील वाहन क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 1596 ला पाठीमागून धडकली. या अपघातात वाहन क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 1596 वरील प्रवासी नारायण शंकरराव पवार, वय 30 वर्षे हे मयत झाले तर अर्थव रामचंद्र पवार, वय 12 वर्षे, दोघे रा. तडवळा (क.) हा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर नमूद बुलेटचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या रामचंद्र शंकरराव पवार, रा. तडवळा (क.) यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web