येरमाळा :  ट्रकच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार 

 
crime

येरमाळा -  जवळगा, ता. जेवर्गी जि. गुलबर्गा येथील- शरणबसप्पा मल्लीकार्जुन कुंभार यांनी दि.19.01.2023 रोजी 16.30 वा. सु. वडगाव (ज) पाटीकडून येडशी कडे रोड क्रॉस करताना रस्त्यावर ट्रक क्र. क.के.ए. 01 ए जे 4713 ही हयगयने व निष्काळजीपणाने चालवल्याने मोटरसायकल हिस पाठीमागून धडकली. या अपघातात बावी (आगलावे),ता. बार्शी येथील मोटरसायकल चालक- सुनिल चंद्रभान आगलावे, वय- 50 वर्षे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रक चालक अपघात स्थळावरुन पसार झाला अशा मजकुराच्या दत्तात्रय मारूती नवले रा. वडगांव, ता. कळंब यांनी दि. 20.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

 उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या वाहने थांबवनऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 20.01.2023 रोजी जिल्हाभरात 09 कारवाया केल्या. यात जेवळी (द), ता. लोहारा येथील- राजेंद्र उपासे,विनोद जाधव या दोघांनी 13.00 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे टमटम क्र. एम.एच. 25 ए 0724 व ॲपे टमटम क्र. एम.एच. 25 ई 9745 या तर नागुर, ता.लोहारा येथील- बंकट जाधव व इंदीरानगर,औसा येथील- सलीम बोरफले या दोघांनी 13.00 ते 14.00 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे टमटम क्र. एम.एच. 25 एस 1309 व ॲपे टमटम क्र. एम.एच. 04 एफ 2621 हे गावातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना आढळले.

तसेच आष्टाकासार येथील- बालाजी सुर्यवंशी व महादेव रणखांब या दोघांनी 16.30 ते 16.40 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25एम 1652 व ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 एम 1048 हे तुगाव येथील बसस्थानका समोर रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना आढळले.तर शेरा गल्ली, कळंब येथील- अहेमद पठाण यांनी याच दिवशी 12.05 वा.सु. आपल्या ताब्यातील महिंद्रा जितो क्र. एम.एच. 25 एजे 1205 हा होळकर चौक कळंब येथील रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना आढळले. 

तर कुक्कडगाव येथील- योगेश खरात यांनी याच दिवशी 10.00 वा.सु. आपल्या ताब्यातील जिप क्र. एम.एच. 25 पी 5197 ही कुक्कडगाव येथील रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना अंबी पोलीसांना आढळले. तर रहिमनगर येथील- फय्याज शेख यांनी याच दिवशी 22.10 वा.सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0148 हा नळदुर्ग बसस्थानका समोर रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 09 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web