येरमाळा : चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलरसह आरोपी अटकेत

 
d

येरमाळा  : माजलगाव, जि. बीड येथील अनिस लाला शेख हे दि. 03.03.2022 रोजी 01.30 वा. सु. नाथवाडी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 23 एएस 0825 व त्यास जोडलेले दोन ट्रेलर त्यांचे नोंदणी क्रमांक एम.एच. 13 जे 3055 व एम.एच. 13 जे 4985 हे चालवत जात होते. दरम्यान पाठीमागून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून आलेल्या तीन अनोळखी पुरुषांनी अनिस शेख यांचा नमूद ट्रॅक्टर- ट्रेलर अडवून अनिस यांसह त्यांच्या सहकाऱ्यास बोलेरो मध्ये बळजबरीने बसवून 05.30 वा. सु. येरमाळा घाटात सोडले. तसेच त्यांना मारहान करुन त्यांच्या जळील दोन भ्रमणध्वनी, 2,000 ₹ रक्कम तसेच नमूद ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रेलर चोरुन नेले होते. या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे गु. क्र. 43 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- दिनकर गोरे, पोउपनि- नाईकवाडी, सपोफौ- पाटील, पोहेकॉ- कर्वे, पोना- किरण शिंदे, शिंदे, डोके, गळमे यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे व कौशल्याचा वापर करुन बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी येथील श्रीराम गोवर्धन चौरे यास सोमवार दि. 30.05.2022 रोजी अटक करुन गुन्ह्यातील चोरीच्या ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रेलर जप्त केले असून पोलीस त्याच्या उर्वरीत साथीदारांचा शोध घेत आहेत.

From around the web