येरमाळा :  चोरीतील मालासह आरोपी अटकेत

 
crime

येरमाळा : इंदापुर जिल्हा पुणे येथील महेश सपकाळ हे दिनांक 30 मार्च रोजी येरमाळा बार्शी रस्त्यावरील घाटातुन इनोव्हा कारने जात असताना कारचा वेग कमी असल्याची संधी साधुन एका अनोळखी तरुणाने कारची डिकी उघडुन 63 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागीने असलेंल्या दोन पर्स घेउन पलायन केल्याने भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे.

            तपासा दरम्यान कळंबचे  सहा. पोलीस अधीक्षक आर. रमेश यांसह येरमाळा पोलीस ठाण्याचे सपेानि- दिनकर गोरे यांच्या पथकाने गुन्हयाची कार्यपध्दती अभ्यासुन तांत्रीक साधनांच्या आधारे तपास केला. यातुनच हा गुन्हा अनिल आबा काळे यांने केला असल्याची पेालीसांची शक्यता बळावली. पथकाने आज दि. 5 एप्रिल रोजी त्यास तेरखेडा परीसरातुन ताब्यात घेतले असता नमुद चोरीतील लपवुन ठेवलेले दागिने पथकाने त्याच्या ताब्यातुन जप्त केले आहे.

 रस्ता अपघात 

उमरगा : हिपरगा (रवा)  येथील गोवर्धन भोसले हे दि. 3 एप्रिल रोजी 16.00 वाजता उमरगा येथील पाच पुलाजवळील रस्त्याने जात होते. यावेळी अज्ञात चालकाने आयशर मिनी ट्रक क्रमांक एम.एच 25 जेयु 8350 हा निष्काळजीपणामुळे व बेदरकारपणे चालवल्याने भोसले यांच्या मोटार सायकलला  पाठीमागुन धडकला. या अपघातात भोसले यांसह त्यांच्या मेाटार सायकलवर पाठीमागे बसलेले शिवानंद दिवटे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमुद अज्ञात ट्रक चालक घटनास्थ्‍ळावरुन वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या गोवर्धन भोसले यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 279, 337, 338 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web