येडशी दरोड्यातील ऐवज मूळ मालकास परत

 
s

उस्मानाबाद : विद्या सतिश जेवे, रा. गणेशनगर, येडशी या कुटूंबीयांसह दि. 23 सप्टेंबर रोजी राहत्या घरात झोपलेल्या असतांना रात्री 03.00 वा. सु. तीन अनोळखी पुरुषांनी त्यांच्या घराच्या जिन्याची जाळी कट करुन घरात प्रवेश करुन विद्या यांसह त्यांच्या कुटूंबीयांना चाकू, गजाने धाक दाखवून कपाटातील 170 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 6,10,000 ₹ रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. अशा मजकुराच्या विद्या जेवे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 234 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380, 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

            गुन्हा तपासात . पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे यांच्या पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपींना लागलीच अटक करुन लुटीतील माल जप्त करण्यात येउन आरोपींविरुध्द  न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तो जप्त माल  न्यायालयाच्या आदेशाने आज 09.12.2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विद्या सतिश जेवे यांना परत देण्यात आला. 

याप्रसंगी उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- . सुरेश साबळे, सपोनि-  योगेश शिंदे, सपोफौ- किशोर रोकडे, पोहेकॉ- चौधरी, समाधान वाघमारे, बडे, पोना- गणेश पाटील, पोकॉ- गणेश खैरे हे उपस्थित होते. आपली मालमत्ता परत मिळाल्याने श्रीमती- विद्या जेवे यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले

From around the web