गोविंदपुर येथे महिलेस मारहाण 

 
crime

शिराढोण : गोविंदपुर, ता. कळंब येथील दिनकर सखाराम मुंढे व ज्ञानेश्वर व्यंकट मुंढे या दोघांनी दि. 30.09.2022 रोजी 17.30 वा. सु. गावकरी- शारदा बबन मुंढे यांच्या घरात घुसून शारदा राहत असलेल्या भुखंड मालकीच्या कारणावरुन शारदा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वेळुच्या काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात शारदा यांच्या डाव्या हाताचे हाड मोडून त्या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या शारदा मुंढे यांनी दि. 02.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मालमत्ते विरुध्द गुन्हे

 वाशी  : वाशी येथील- नरसिंग बाबुराव कवडे यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 9365 ही दि. 23.09.2022 रोजी 22.00 वा. ते दि. 24.09.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान वाशी येथील त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नरसिंग कवडे यांनी दि. 02.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रस्ता अपघात

 उस्मानाबाद : लिंबोणी बाग तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील- योगेश लिंबराज थोरात यांनी दि. 27.09.2022 रोजी 17.00 वा. सु. उस्मानाबाद येथील ग्रीन लॅन्ड शाळेसमारील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएक्स 1683 ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने घसरली. या अपघातात योगेश थोरात यांच्या सोबत मो.सा. वर पाठीमागे बसलेले- सागर अंकुश कोकरे, वय 21 वर्षे, रा. काक्रंबावाडी, ता. तुळजापूर हे खालीपडून त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने ते वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- आतुल श्रीमंत कोकरे, रा. काक्रंबावाडी यांनी दि. 02.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web