२५ हजार लाच घेताना अचलेरचा तलाठी , कोतवाल गजाआड 

 
lach

लोहारा - शेतीचा फेरफार वरिष्ठाकडून मंजूर करून देण्यासाठी २५ हजार लाच घेताना अचलेर सज्जाचा तलाठी आणि कोतवालास एसीबी पथकाने रंगेहात पकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

             यातील तक्रारदार- पुरुष ( वय 24 वर्षे )    यांचे वडिलांनी सन 2005 मध्ये घेतलेल्या शेतीचा फेरफार वरिष्ठाकडून  मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याचे मान्य करून तसेच आज रोजी सदर कामासाठीच वरिष्ठाकडून फेर फार मंजूर करून देण्यासाठी आणि ऑनलाईन नमुना नंबर 9 ची नोटीस काढण्यासाठी 1.युवराज नामदेव पवार ( वय 36 वर्षे, पद :- तलाठी,सजा-अचलेर, ता.लोहारा ) आणि  प्रभाकर रुपनर ( वय-37 वर्षे, पद-कोतवाल,सजा-अचलेर, ता.लोहारा )  यांनी तक्रारदार यांना 30,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडी अंती 25,000/- रुपये लाच रक्कम आलोसे पवार यांनी पंचासमक्ष स्वीकारली , यावरून दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 हा सापळा इफ्तेकर शेख,सिद्धेश्वर  तावसकर ,विष्णु बेळे ,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे  यांनी रचला होता. नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, उस्मानाबाद 02472 - 222879 @ टोल फ्रि क्रं. 1064

From around the web